रावेरमध्ये 12 प्रभागातून 24 नगरसेवकांची होणार निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेरमध्ये  12 प्रभागातून 24 नगरसेवकांची होणार निवड

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर नगर पालिकेची (Raver Nagar Palika) प्रभाग रचना गुरुवारी जाहीर करण्यात आली. पूर्वी रावेर शहरात आठ प्रभागातून 17 नगरसेवक (Nagarsevak) निवडून येत होते मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार आता रावेर  शहरात (Raver City) 12 प्रभाग झाले असून 24 नगरसेवक (Nagarsevak) निवडून येणार आहेत. प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची अखेरची मुदत 17 मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल, असे रावेर नगर पालिकेच्या मुख्यधिकारी स्वालीहा मालगावे (Raver Nagar Palika CEO Swaliha Malgave) यांनी  "सुवर्ण दिप न्युज" शी बोलताना सांगितले. [ads id="ads1"] 
अशी असणार रावेर  शहराची प्रभाग रचना

 प्रभाग क्रमांक एक- महात्मा फुले चौक, भगवती नगर, मरीमाता मंदीर परीसर, नागझिरी पोलिस चौकीच्या समोरील भाग,

 प्रभाग क्रमांक दोन- छत्रपती शिवाजी परीसर व प्लॉट एरीया तसेच पाराचा गणपती परीसर तसेच जहागीरदार वाडा परीसर,

 प्रभाग क्रमांक तीन- मंगरूळ दरवाजा परीसर, तिरुपती टॉकीज परीसर, भोई वाडा भाग, रथगल्ली परीसर, मोमीनवाडा भाग, 

प्रभाग क्रमांक चार- लंगडा मारोती मंदीरा समोरील भाग, आठवडे बाजार परीसर, गजानन नगर, अफू गल्ली परीसर, मेनरोड भाग , [ads id="ads2"] 

प्रभाग क्रमांक पाच- विखे चौक परीसर, दत्तमंदीर भाग, बाविशी गल्ली भाग, इमाम वाडा भाग, रींग रोड परीसर, 

प्रभाग क्रमांक सहा- थडा मारोती परीसर, अब्दुल हमीद चौक परीसर, इमाम वाडा भाग, देशमुखवाडा भाग, नगरपालिका गढीचा भाग, 

प्रभाग क्रमांक सात- कौसर मशीद परीसर, इमाम वाडा भाग, मरकज मस्जिद परीसर, मास्तर कॉलनी, 

प्रभाग क्रमांक आठ- कुलफऐ राशेदिन मशीद परीसर, ग.नं. 1283 मधील, नगरपालिका हॉल परीसर, उटखेडा रोड, सप्तश्रृंगी मंदिर परीसर, ईदगाह रोड परीसर, 

प्रभाग क्रमांक नऊ- उटखेडा रोड परीसर, रुस्तम चौक परीसर, डॉ.आंबेडकर नगर भाग,

 प्रभाग दहा- उटखेडा रोड परीसर, जुना सावदा रोड परीसर, तिरुपती नगर परीसर, पीपल्स बँक कॉलनी परीसर,

 प्रभाग क्रमांक अकरा- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भाग, स्टेशन रोड, पेट्रोल पंप परीसर, मराठा मंगल कार्यालयासमोरील भाग, न्यायालयासमोरील भाग, 

प्रभाग क्रमांक बारा - व्ही.एस.नाईक कॉलेज परीसर, स्वामी समर्थ केंद्र परीसर, विद्या नगर, सोनू पाटील नगर परीसर, मराठा मंगल कार्यालय परीसर, रेल्वे स्टेशन परीसराचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!