यावल दि.18(सुरेश पाटील) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दि. 21 मार्च ते 24 मार्च असे एकूण 4 दिवस मोफत सर्वरोग निदान,व दंत व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी आज दि. 18 रोजी ग्रामीण रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. [ads id="ads1"]
राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या वतीने सदर शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा लाभ आदिवासी व ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील जनतेने,गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान,दंत व शस्त्रक्रिया शिबिर करण्यात आले आहे सोमवार दि.21 मार्च पासून हे शिबिर सुरू होत असून 24 मार्च पर्यंत हे शिबीर होणार आहे या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी केली जाईल तर दुसऱ्या दिवसापासुन ते चौथ्या दिवसा पर्यंत शस्त्रक्रियेस पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात अपेंडिक्स,हर्निया, मुतखडा,हायड्रोसिल,गर्भ पिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या शस्त्रक्रिया,शरीरावर झालेल्या गाठी आदींच्या यशस्वी शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार आहे.सदर शिबिर हे ग्रामीण रुग्णालयांमध्ये 21 मार्च रोजी सुरू होणार आहे.या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्ण यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आपली नोंदणी करू शकतात,सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा महाजन,नोडल अधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या उपस्थितीत तसेच जनरल सर्जन डॉ.सुशांत सुपे,स्री रोग तज्ञ डॉ.संदीप पाटील,डॉ.निता भोळे, बालरोग तज्ञ डॉ.प्राची सुरतवाला डॉ.उदय पाटील दंतरोग तज्ञ डॉ. मोनिका देसाई,अस्थिरोग तज्ञ डॉ. विजय कुरकुरे,नाक,कान,घसा तज्ञ डॉ.नितीन विसपुते,नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रविण पाटील,जनरल सर्जन डॉ.बाराजी बाचेवर,बाल रोग तज्ञ डॉ.मनोज पाटील इत्यादी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहुन मोफत वैद्यकीय तपासणी आणि वेळ पडल्यास मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत,तेव्हा गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बी.बी.बारेला,नानासाहेब घोडके,विजय वाढे सह रूग्णालय प्रशासना कडून करण्यात आले आहे.

