त्याच ठिकाणी बदलीतून सूट मिळविल्याचे गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल (Raver BDO Dipali Kotwal) यांनीच वेळोवेळी प्रकरणाच्या चौकशी अंती मान्य केल्याचे व तसा अहवाल उप मुख्य कार्यकारी, जळगाव यांना दि २५.११.२०२१ रोजी पाठविल्याचे आणि दिव्यांग संघटनेस वेळोवळी केलेल्या पत्रव्यवहारातही उघड झाल्याने बी डी ओ (BDO) बनवाबनवी करीत असल्याचे दुसऱ्याच दिवशी स्पष्ट झाले आहे.सदर प्रकरणी प्रतिनिधी यांनी खात्री केली असता, या पाचही ग्रामसेवकांच्या बदल्या सन २०१६ ते २०१९ या वर्षात झाल्याच्या दिसून येत आहेत. [ads id="ads2"]
राहुल रमेश लोखंडे सन २०१६ मध्ये यावल येथून आलेले आहेत आणि या अपंग प्रमाणपत्रावर त्यांनी सन २०१७ पासून रेंभोटा, रेंभोटा येथून मांगी, मांगी येथून कोचुर बु येथे बदलीचा लाभ घेतलेला आहे.छाया रमेश नेमाडे या सन २०१७ मध्ये रावेर तालुक्यात (Raver Taluka) आलेल्या आहेत आणि एका वर्षातच आपापसात अपंग प्रमाणपत्राच्या आधारे कोचुर येथून मांगी येथे बदली करून आजतागायत काम करीत आहेत.
शामकुमार नाना पाटील मुक्ताईनगर येथून अपंग प्रमाणपत्र दाखवून जिल्ह्यावरून सन २०१७ मध्ये रावेर तालुक्यात विटवे (Vitave वर्ष Raver) पूर्ण होण्याच्या आधीच विटवे येथून सिंगत येथे आणि सिंगत बरोबरच त्यांच्याकडे पुनखेडा ग्रा प चा अतिरिक्त कार्यभार एका विस्तार अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने सोपविण्यात आला आहे.नितीन दत्तू महाजन आणि रवींद्रकुमार चौधरी हे दोघे या प्रमानपत्राच्या आधारावर गहूखेडा आणि पुरी गोलवाडे येथून बदलीतून सूट मिळवून संबधित ग्रा प ला आजतागायत ठाण मांडून आहे. वरील सर्व ग्रामसेवक यांचा बदलीचा, बदलीतून सूटचा कालावधी सन २०१६-२०२० असा दिसून येत आहे.
१५ मे २०१४ चा शासन निर्णय काय सांगतो : तालुका अंतर्गत प्रशासकीय बदलीसाठी कर्मचारी किमान मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी पाच वर्ष असला पाहिजे. विनंती बदलीसाठी देखील हिच अट आहे , मात्र शासन निर्णय धाब्यावर बसवून या ग्रामसेवकांशी संगनमत करुन आर्थिक हीत संबध जोपासून तत्कालीन गट विकास अधिकारी डॉ सोनिया नाकाडे आणि हबीब तडवी यांनी या बेकायदेशीर अपंग प्रमानपत्राच्या आधारे बदलीचा लाभ दिल्याचे उघड होत आहे,लोखंडे, नेमाडे, शामकुमार पाटील यांची तर रावेर तालुक्यात यायला वर्ष न होताच बदली झाल्याचे स्पष्ट झालेले असतांना श्रीमती दीपाली कोतवाल आपल्या प्रेस नोट मधून प्रशासनाची आणि तक्रारदारांचीही फसवणूक करतांना दिसत आहेत, त्या मुळे दिव्यांग संघटनेने त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाईसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडे तक्रार केली आहे.

