ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात भाषण कौशल्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
ऐनपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी मुले-मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा १० व्याख्याने अंतर्गत भाषण कौशल्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते माननीय प्रा. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विनायक सावरकर व साने गुरुजी यांचे साहित्य वाचले पाहिजे ते खरे संशोधक होते, देशभक्त होते. तसेच उत्तम वक्ता होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, संवेदनशील, ऑब्झर्वर असणे आवश्यक आहे. [ads id="ads2"]
ऐकून घेण्याची क्षमता, प्रगल्भता, वेळेचे नियोजन, उत्तम श्रोता असणे गरजेचे आहे. तसेच उत्तम वक्ता होण्यासाठी पूर्वग्रहदूषित असता कामा नये, नकारात्मक दृष्टिकोन असता कामा नये, असंवेदनशील असता कामा नये, श्रोत्यांना समजून घेणे आवश्यक आहे. असे त्यांच्या व्याख्यानांमध्ये सांगितले. तसेच या व्याख्यानाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी आपली वाणी, भाषण कौशल्य, संवेदनशीलता, वाचन करण्याची क्षमता, उत्तम असणे गरजेचे आहे. विषयाचे ज्ञान, स्पष्ट मांडणी, भाषाशैली योग्य असले पाहिजे असे त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले या व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व परिचय करून देण्याची जबाबदारी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ विनोद रामटेके यांनी सांभाळली. या व्याख्यानाच्या आभासी कार्यक्रमाला 122 विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या आभासी कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. आर. व्ही.भोळे प्रा. डॉ.के.जी. कोल्हे,एच.एम.बाविस्कर,प्रा.डॉ. जयंता नेहेते,प्रा.डॉ.पी.आर.गवळी,प्रा.मुळे, प्रा. डॉ. एस.एन. वैष्णव प्रा. डॉ. एस एस. साळुंके प्रा. अक्षय महाजन,एस.पी.उमरिवड, प्रा. प्रदीप तायडे प्रा.एम के सोनवणे, प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी परिश्रम घेतले.शेवटी मान्यवरांचे आभार प्रा. प्रदीप तायडे यांनी मानले

