आबासाहेब राजेंद्र वाघ यांची माहिती अधिकार कार्यकर्ता ( RTI ) महासंघाच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


🔹 माझ्या पदाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करणार - आबासाहेब राजेंद्र वाघ

धरणगाव प्रतिनिधी (पी.डी.पाटील सर) धरणगावाचे सुपुत्र,शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर विचारांचे सच्चे वारसदार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य, सतत अन्यायावर वाचा फोडणारे, वेळोवेळी धरणगावकरांच्या समस्या निर्भिडपणे मांडणारे, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, धरणगाव माळी समाजाचे सल्लागार पंच, पुस्तकमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, स्पष्टवक्ता, कधीही तडजोड न करणारे, बहुआयामी व्यक्तीमत्व, सत्यशोधक आबासाहेब राजेंद्र वाघ यांची माहिती अधिकार कार्यकर्ता ( RTI ) महासंघाच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.[ads id="ads1"]  

            सदर निवड नवी मुंबई येथील स्वराज बहुउद्देशीय संस्था संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे संस्थापक अध्यक्ष मा.सुभाष बसवेकर यांनी निवड केली. [ads id="ads2"] 

             आबासाहेब राजेंद्र वाघ आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात संघटनेत केलेल्या कार्याची दखल घेता श्री. वाघ यांची निवड करण्यात आली.असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले. कार्याध्यक्ष शेखर कोलते, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.आशिष बाचपाई यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        धरणगाव ग्रामीण व शहरातील मित्र परिवाराकडून आबासाहेब राजेंद्र वाघ यांचे अभिनंदन व सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!