यावल येथील संपात सहभागी असलेल्या एसटी चालकाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (किरण तायडे) : यावल येथील एसटी आगारातील संपात सहभागी असलेले एका 48 वर्षीय एसटी बस चालकाने जळगावात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून मयत चालकाचे नाव शिवाजी पंडित पाटील रा. बारीवाडा यावल असे असुन त्यांनी सोसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.[ads id="ads1"] 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कामगार हे नोव्हेंबर महिन्यापासून संपावर आहेत या संपामुळे व संपकरी कामगारांनी सरकारमध्ये तोडगा निघत नसल्याने एसटी कामगारांच्या कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी अनेक एसटी चालक वाहक हे डिप्रेशन मध्ये आले आहेत. [ads id="ads2"] 

  तोडगा निघत नसल्याने संप अजूनही सुरूच आहे याच संपात सहभागी असलेले यावल एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी पंडित पाटील वय 48 रा. बारी वाडा यावल यांनी आज सोमवार 28 मार्च 2022 रोजी जळगावात येथील शिवाजी नगर अमरधाम जवळील रेल्वेलाइन आत्महत्या केली. सदर त्यांच्या आत्महत्येचे वृत्त शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहली असुन त्यात मनस्थिती खराब असल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत आहे असे स्पष्ट केले आहे. त्यांचा मृतदेह जळगाव येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात शवविच्छेदना करीता नेण्यात आला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!