रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु येथे महाशिवरात्री निमित्त ता. १ मार्च रोजी सकाळी ८ वाजे पासुन ते ११ वाजे पर्यत्त महाफराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, [ads id="ads1"]
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील श्री महादेव मंदिरा मध्ये साला बाद प्रमाणे या वर्षी सुद्धा सर्व महादेव भक्तांनी फराळीच्या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आला होता सदर महादेव मंदिर८० ते९० वर्षे पुर्ण करत आहे .[ads id="ads2"]
त्या पुर्व संध्येला संपुर्ण मंदिरा मंध्ये रंगरंगोटी करण्यात आली होती महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी आज सकाळ पासुन सुरु होती पुजा अर्चना या मध्ये सर्व महादेव भक्त मग्न झाले होते जुन मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, सदर महादेवानच्या मुर्तीचे पुजन युवा नेते धनंजय शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन करण्यात आले त्या वेळेस इतर मान्यंवर सुद्धा उपस्थित होते.