रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रविंद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी परिवार, रावेर यांच्या तर्फे महिलांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला, कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे 80 80 वर्षीय ज्येष्ठ आजीबाईंनी या संगीत खुर्ची मध्ये सहभाग घेतला.[ads id="ads1"]
कोरोना संकटातून बाहेर येत असताना प्रत्येक जण अलिप्तता वासाला कंटाळला असून त्यातून जनजीवन आता सुरळीत होत आहे. लोकांनी कोरोना पासून सुटकेचा श्वास सोडला असून दैनंदिन जीवन सुरू केलेले आहे, संपूर्ण कॉलनी वासी, व परिसरातील नगर वासी एकत्र यावे, त्यांच्यातील उत्साह द्विगुणीत व्हावा या दृष्टिकोनातून स्वामी परिवार आयोजित संगीत खुर्ची च्या कार्यक्रमात जवळपास दोनशे महिलांनी सहभाग घेत संगीत खुर्ची चा कार्यक्रम उस्फूर्तपणे पार पाडला. [ads id="ads2"]
संगीत खुर्ची च्या स्पर्धेनंतर महिलांनी उस्फूर्तपणे गरबा आयोजित करून गरब्याचा देखील आनंद उधळला, संगीत खुर्ची स्पर्धेचे तीन ठिकाणी ग्रुप पाडून त्यातून विजेते नंबर काढण्यात आले, तडवी कॉलनी परिसरातून शांतीदुत नगर (Shantidoot Nagar Raver) च्या मधून सौ ज्योती शेखर वाघ या विजेत्या ठरल्या, अष्टविनायक नगर परिसरातून चैताली जितेंद्र पाटील तर श्रीकृष्ण नगर परिसरातून सौ योगिता नितिन महाजन या विजेत्या ठरल्या सर्व सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून विजेत्या महिलांना पैठणी साड्या स्वामी परिवारातर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हेहे वाचा :- युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
सदरचा कार्यक्रम दिनांक 5 मार्च 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला असून सर्व महिलांनी उपस्थिती देऊन आपला उत्साह द्विगुणीत करण्याचे आवाहन रवींद्र पवार सर व मित्रमंडळी कडून करण्यात आलेले आहे सदर सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात च स्वामी परिवारातर्फे शिवजयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील सहभागी महिलांना देखील सहभागाबद्दल प्रमाणपत्र व प्रत्येक ग्रुप मधून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विजेत्या भगिनींना पैठणी साड्या देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्वामी परिवाराच्या संपूर्ण सदस्यांकडून करण्यात आले होते.
हेही वाचा :- Raver : तांदलवाडी येथे प्रिमीअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
स्वामी परिवाराच्या सचिव सौ मनिषा पवार यांचे मार्गदर्शनाखाली हिरकणी बोरोले, रूपेश पाटील सर , सुर्यवंशी सर, वर्षा अहिरे, अनिता शिंदे, वर्षा पवार, मिनाक्षी राणे, उन्नती महाजन, भारती चौधरी, वैशाली जळगावकर, अश्विनी महाजन, शारदा चौधरी ,गायत्री गिरी, प्रियंका महाजन, नयना सोनवणे, सविता भुसे, शरीफा तडवी ,रूक्साना तडवी,शारदा चौधरी , मंदाकीनी महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गणेश महाजन, नारायण महाजन, कांतीलाल महाजन,दिलीप पवार, उमेश पाटील , समीर तडवी, श्याम जाधव,शिरीष मैराळे , प्रवीण महाजन, सुरेखाबाई बारी , माया बाई, आशा बाई, वैशाली बाई यांचेसह संपूर्ण सदस्यांनी परिश्रम घेतले.