धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव येथील कै. सुरेश भिकाजी सोनवणे यांचे आज दुपारी अपघाती निधन झाले.
अमळनेर रोडवरील भोणे फाट्याजवळ दुपारी १२ वाजता कामानिमित्त जात असतांना क्रेटा या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात सोनवणे यांच्या डोक्याला मार लागला व जागीच मृत्यू झाला.[ads id="ads2"]
सुरेश भिकाजी सोनवणे बाल विद्यामंदिर कोहिनूर सिटी कुरला, मुंबई येथे कलाशिक्षक म्हणून नोकरीस होते. नुकतेच दोन दिवसांपूर्वी आईच्या गंधमुक्ती व उत्तर कार्याचा कार्यक्रम झाला. आणि आज सुरेश सोनवणे यांच्यावर काळाने झडप घातली. धरणगाव शहरात त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.[ads id="ads1"]
उद्या दिनांक १ एप्रिल, २०२२ रोजी त्यांची अंत्ययात्रा सकाळी ठीक १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.


