गुरुवारी सकाळी उघडकीस आली घटना ; निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद[ads id="ads1"]
रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील ५७ वर्षीय शेतकऱ्यांने कर्ज बाजारीपणाल कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दि.३१ गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव हिरामण सोनजी सावंत (वय-५७) आहे. घरातील सर्व सदस्य नातेवाईकांकडे लग्नानिमित्त गेलेले होते. यावेळी ते घरी एकटे असतांना रात्री राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे


