सविस्तर वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव व सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर, विद्यार्थी विकास विभाग, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता व एकात्मता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads2"]
या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. मनीष जोशी (आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून आपला भारत देश हा महान आहे.एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतीय प्रतिज्ञेचे पालन केले पाहिजे.
थोर देशभक्तांचा परीचय त्यांनी आपल्या भाषणातून करून दिला. विविध भाषा, विविध जाती- धर्म, विविध पेहराव, विविध चालीरीती, परंपरा, संस्कृती असून आपला भारत एक आहे म्हणून श्रेष्ठ आहे असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनोद रामटेके यांनी केले. व कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. के. सोनवणे यांनी करून दिला. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहाय्यक विकास अधिकारी प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे, सहाय्यक महिला विकास अधिकारी प्रा. डॉ. निता वाणी, सिनेटर सदस्य प्रा डॉ के जी कोल्हे व प्रा. डॉ. पी आर. गवळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला १०३ विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे आभार डॉ नीता वाणी यांनी मानले.


