रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील अहीरवाडी (Ahirwadi) येथील युवकाला आपल्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे महागात पडले आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात (Raver Police) त्याच्यावर रावेर पोलिसात (Raver Police) गुन्हा दाखल करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील अहीरवाडी (Ahirwadi) येथील रहिवासी आकाश चौधरी (वय २९) याने आपल्या वाढदिवशी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण होतील असे कृत्य केल्याप्रकरणी पो.कॉ.चैतन्य पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबतची माहिती रावेर (Raver PI Kailas Nagare) पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नितिन डांबरे करीत आहेत.



