रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर वाणी गल्ली येथे आज महाशिवरात्रीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात परिसरातील ८६ रक्तदात्यांनी रक्तदानाचे महान कार्य केले.[ads id="ads1"]
सदरील रक्तदान शिबीर हे जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडले. सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. दत्तप्रसाद दलाल व डॉ. मिनल दलाल यांनी अनमोल मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
तसेच प्रथमेश दलाल, अमोल वि. पाटील, राहुल मराठे, महेश दलाल, यशवंत दलाल, जयेश यावलकर, किरण वाणी, सौरभ भंगाळे, गणेश बारी, रोहित बाऊस्कर, परेश पाटील, किशोर दलाल, अविनाश बुवा, अनिल विटनारकर, निलेश दलाल, योगेश दलाल तसेच ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवारांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


