रावेर (सिद्धार्थ ठाकणे) रावेर येथील स्वामी एज्यूकेशन आणि कपडा बॅकेचे संस्थापक रविंद्र पवार सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रावेर तालुक्यातील गारबर्डी, गारबर्डी धरण वस्ती, जिन्सी या ठीकाणी गोर गरीबांना, गरजूंना कपडे वाटप करण्यात आले. [ads id="ads1"]
या ठीकाणी मोठ्या संख्येने अबाल वृद्ध, महीला भागिनी उपस्थित होत्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास महाजन सर, रुपेश पाटील सर, श्याम जाधव सर,हरलाल पवार,नारायण महाजन, कांतिलाल पाटील , ज्ञानेश्वर पाटील, दिनकर महाजन यांनी मेहनत घेतली.[ads id="ads2"]
गेल्या 8 वर्षापासून कपडा बॅकेच्या माध्यमातून रावेर आदिवासी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी कपड्यांचे वाटप करण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवा सत्कार्य केले जाते.


