रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथील श्री. व्ही.एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि 8 मार्च 2022 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग तसेच IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावेर तालुकाच्या तहसीलदार श्रीमती उषाराणी देवगुणे या होत्या यावेळी उपस्थित महाविद्यालयीन युवती आणि महिला यांना मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून मुलींनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे ,महिला दिनाच्या निमित्ताने युवतींनी संकल्प केला पाहिजे, जीवनात उद्दिष्ट निश्चित करून त्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. [ads id="ads2"]
चांगल्या समाजाची निर्मिती महिला च्या संस्कारातून होत असतेआणि हे संस्कार रुजविण्यासाठी शिक्षक महत्वाची भूमिका निभावतात असे स्पष्ट केले,.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून प्रा.क्रांती नाईक ,प्रा.वंदना पाटील या होत्या यांनी आपल्या मनोगतात स्त्री-पुरुष समानता आणि मुलगी वाचवा तर समाज वाचवा या विषयावर आपले सविस्तर विचारले मांडले, या कार्यक्रमात सर्वं महसूल विभागातील महिला कर्मचारी यांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला होता.
कार्यक्रम उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. दलाल हे होते तर विचारमंचवर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. व्ही.बी.सुर्यवंशी IQAC समन्वक डॉ.एस. आर.चौधरी,कबचौउमवी सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील हे होते.या कार्यक्रमात प्रा सी.पी.गाढे यांनी भारतातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिला च्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संदीप धापसे यांनी केले,तर सूत्रसंचालन डॉ.जी.आर.ढेम्बरे आणि उपस्थितांचे आभार प्रा.सत्यशील धनले यांनी केले. या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठया संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

