Raver : केळीचे घड कापणाऱ्या संशयितास सावदा पोलिसांनी केले जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील कुंभारखेडा (Kumbharkheda) येथील शेतकरी अनिल पाटील यांचे बागेतील केळीचे ३० घड कापून फेकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. याच ठिकाणी केळी खोडांवर शेतकऱ्यांना धमक्या देणाऱ्या तीन चिठ्ठ्या चिकटवल्या होत्या.[ads id="ads2"]  

   याप्रकरणी रावेर - यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी (Raver MLA Shirish Chaudhari) यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी गतिमान चक्रे फिरवून  कुंभारखेडा येथीलच नामे अतुल श्रीराम महाजन (वय ३२) याला अटक केली आहे. चौकशीमध्ये त्याने कामावरून कमी केल्याच्या रागातून हे असे कृत्य मी केल्याची कबुली दिली. 

सावदा पोलीस स्टेशनचे ए. पी.आय. देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड यांचेसह पथकाने ही कारवाई केली. 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!