रावेर येथील महिला डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी
महिलादिनाच्या पुर्वसंध्येला रावेर शहरातील (Raver City) माऊली हॉस्पिटलच्या (Mauli Hospital) महिला डॉ. योगीता पाटील (Dr.Yogita Patil) या डॉ.संदीप पाटील (Dr.Sandip Patil) यांच्यासोबत खाजगी कामानिमित्त मध्यप्रदेशातील ब-हाणपूर (Burhanpur) येथे आपल्या खाजगी वाहनाने जात होत्या. तालुक्यातील खानापूर (Khanapur) येथील उड्डाणपूलाजवळ एक इसम रस्त्यावर पडलेला दिसून आला. [ads id="ads2"]
त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो बेशुध्दावस्थेत पडलेला होता. त्या ठिकाणी कुणीही थांबत नसल्याने महिला डॉक्तरांनी स्वतःचे वाहन थांबवून डॉ. संदीप पाटील (Dr.Sandip Patil) यांच्या मदतीने वाहनात असलेल्या प्रथमोपचार साहित्याने जखमी रूग्णावर उपचार करण्यास सुरूवात केली. डॉक्टरांच्या गाडीत नेहमीच अत्यावश्यक इंजेक्शन व साहित्य असल्याने त्यांनी योग्यवेळी योग्य उपचार रूग्णावर करून रूग्णवाहिकेव्दारे रूग्णास रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात (Raver Rural Hospital) रवाना केले. महिला दिनाच्या पुर्व संध्येला महिला डॉक्टरांकडून वेळीच उपचार मिळाल्याने रूग्णाचे जीव वाचल्याने डॉक्टरांचे परिसरात कौतुक होत आहे.

