निंभोरा गावं दरवाज्यापासुन तर निंभोरा सब स्टेशन पर्यंत अत्यन्त दैनंनिय व्यवस्था झाली आहे.या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनाचेही नुकसान होत आहे. रात्री-बेरात्री आजारी माणसाला रावेरला घेऊन जातांना रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.[ads id="ads2"]
या रस्त्यावरून असंख्य शेतकरी यांचे केळीने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, या रस्त्यावरून भरून जात असतात.केळीने भरलेले वाहन पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसानही मोठया प्रमाणात झालेले आहे. आज सकाळी गुरूदास बऱ्हाटे, व ललित कोळंबे उर्फ पप्पू सर गाडी वरून याच रस्त्यावर स्लिप होऊन खड्डे चुकवतांना पडले. दोन्हीही ग्रामपंचायत सदस्य पुत्र आहेत. त्यांच्या गाडीचे नुकसान होऊन त्यांना ही दुखापात झाली.
आ. शिरीष चौधरी यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा राहिलेला अर्धा एक किलोमीटरचा रस्ता दुरुस्त त्यांच्या निधीतून करून द्यावा ही ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्ता विरोधात आंदोलन, उपोषणास बसण्याची तयारी ललित कोळंबे सर यांनी केली आहे.

