जागतिक महिला दिनानिमित्त रावेर मध्ये महिला डॉक्टरांचा सन्मान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जागतिक महिला दिनानिमित्त रावेर मध्ये महिला डॉक्टरांचा सन्मान

रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) -आज दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त येथिल रमाई महिला मंडळातर्फे शहरातील महिला डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुणाताई चौधरी यांनी भूषविले तर उद्घाटन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांचे हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा रिया पाटील, माजी उपनगराध्यक्ष शकुंतला महाजन, मानसी पवार, वर्षा महाजन आदी उपस्थित होते. [ads id="ads1"] 
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर डॉ. सुचिता कुयटे यांचे महिलांचे आरोग्य आणि सिझेरियन बाळंतपण या विषयावर व्याख्यान झाले. [ads id="ads2"] 
  तसेच शहरातील महिला डॉक्टरांचे चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अरुणाताई चौधरी यांचे हस्ते शाल, श्रीफळ, गुलदस्ता आणि सन्मानपत्र देऊन अनुक्रमे डॉ. अमिता महाजन, डॉ. हर्षा पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. सुचिता कुयटे, डॉ. चैताली चौधरी, डॉ. प्रीती सावळे, डॉ.वर्षा बोरोले, डॉ. अर्चना पाटील, डॉ. रुपाली महाजन, डॉ.यास्मिन खान, डॉ. हर्षाली पवार, डॉ. नम्रता महाजन, डॉ. राजेश्वरी गजरे, डॉ. माधवी वाघोदे ,कांता बोरा,सौ. कल्पना नगरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. अरुणा चौधरी यांनी महिलांनी संघटीतपणे कार्य करून वाईट प्रवृत्ती विरुध्द लढा दिला पाहिजे स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे. 
  रमाई मंडळाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका रंजना गजरे यांनी केले, सूत्रसंचालन कांचन बनकर व सौ. वर्षा इंगळे यांनी केले तर आभार सौ. संगीता अटकाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनाली वाघ, संगीता ससाणे, प्रमिला भालेराव, उज्वला सुरदास, आशा महाले, सुमन कोंघे, निर्मला तायडे, प्रमिला लोंढे, संगीता दामोदरे, मंगला दामोदरे,अरुणा रायमळे,रजनी सपकाळे,चंद्रप्रभा गजरे, सुनीता मेढे, प्रीती तायडे, तेजल तायडे,शुभांगी अधांगळे, आयुषी ससाणे, मोनिका दामोदरे,प्रियंका गजरे, संगीता गजरे,माया तायडे, निकिता वाघ ,साक्षी सुरदास आदींनी परिश्रम घेतले यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!