बेपत्ता वृध्द महिलेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ ; यावल तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 यावल प्रतिनिधी (किरण तायडे) यावल तालुक्यातील मालोद (Malod Taluka Yawal) येथील बेपत्ता झालेल्या ७५ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवार १६ मार्च रोजी यावल पोलीस (Yawal Police)  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.येसूबाई नामदार तडवी (वय-७५) रा . मालोद ता. यावल असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे.[ads id="ads1"] 

यावल पोलीसांकडून (Yawal Police) मिळालेली माहिती अशी की, येसूबाई नामदार तडवी (वय-७५) रा . मालोद ता. यावल (Yawal) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, शनिवार १२ मार्च रोजी मुलीकडे जावून येते असे सांगून सकाळी १० वाजता घराबाहेर पडल्या. त्यानंतर सायंकाळपर्यंत त्या मुलीकडे पोहचल्या नाही. [ads id="ads2"] 

  त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांनी त्यांचा परिसरात आणि नातेवाईकांकडू शोधाशोध सुरू केली. दरम्यान बुधवार १६ मार्च रोजी सकाळी गावातील अरमान तडवी यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधीचा वास येत होता. यावेळी आत डोकावून पाहिले असता कुजलेला मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी आत्महत्या केली किंवा विहिरीत पडल्या यांची अजून माहिती उपलब्ध झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे (Yawal Police Station) पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह वैद्यकिय पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी दगडू रमजान तडवी (वय-५४) रा. मालोद ता. यावल यांच्या खबरीवरून यावल पोलिस (Yawal Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!