ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेल्या सरदार वल्लभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर तेथे मराठी विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भागवतभाऊ पाटील हे होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून माजी प्रभारी प्र कुलगुरू मा. प्रा. डॉ. बी. व्ही. पवार हे होते. यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन मूल्य निर्माण करण्यासाठी मराठी साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे असे म्हटले.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संतोषजी चव्हाण सहसंचालक, उच्चशिक्षण जळगाव विभाग जळगाव यांनी आपल्या मनोगतातून मराठी साहित्यातील संतांनी मानवी जीवन मूल्यांची जोपासना केलेली दिसून येते, असे म्हटले. [ads id="ads2"]
तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, यांनी आपल्या मनोगतातून मराठी साहित्यातील मानवी जीवनाचे होत असलेले परिवर्तन आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यातून अविष्कृत झाले आहे, असे म्हटले. प्रा. डॉ.आशुतोष पाटील, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे होते.
यांनी आपल्या मनोगतातून बदलत्या काळानुसार लेखकांनी सामाजिक जीवन मूल्य आणि जाणिवा कशा अभिव्यक्त होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे म्हटले. बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. फुला बागुल, एस पी डी एम कॉलेज शिरपूर हे होते. आपल्या बीजभाषणातून यांनी काव्य संमेलन, समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या कवितेचे तत्व तपासण्याची वेळ आली आहे असे आवर्जून म्हटले. काव्य निर्मितीही गांभीर्याने करण्याची बाब आहे असे देखील त्यांनी प्रतिपादन केले. जागतिकीकरणाचे परिणाम साहित्यामध्ये कसे दिसतात हे देखील त्यांनी मांडले. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
आपल्या बीजभाषणातून बागुल सरांनी सहभागी प्राध्यापकांना आधुनिक मराठी साहित्यातील बदलते सामाजिक जीवन मूल्ये आणि जाणिवा सर्व साहित्य प्रकारातून कश्या विकसित झाल्या आहेत याची सखोल, विपुल अशी माहिती दिली. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी काम पाहिले, तर प्रास्ताविक प्रा. महेंद्र सोनवणे यांनी केले , आणि आभार प्रा.अक्षय महाजन यांनी केले. यानंतर लगेच पहिले सत्र सुरू करण्यात आले. यात प्रमुख वक्ते म्हणून संदीप भुयेर हे होते तर या सत्राचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. वले सर पाचोरा महाविद्यालय हे होते आपल्या व्याख्यानातून संदीप भुयेर यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय सखोल माहिती सहभागी प्राध्यापकांना दिली.
यापुढच्या सत्रामध्ये निबंध वाचन करण्यात आले. या सत्रात अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. नम्रता बागडे , उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद होत्या . या सत्रामध्ये प्रा.डॉ. वाल्मीक आढावे, डॉ. तुकाराम भवर, डॉ. वीरा मांडवकर, डॉ. दिलीप पाटील आणि प्रा.डॉ.उज्वला जानवे होत्या. तर दुसर्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.जितेंद्र गिरासे हे होते. या सत्रात प्रा.डॉ शरद बिऱ्हाडे प्रा.डॉ योगेश महाले, प्रा.डॉ संजय पाटील, प्रा.डॉ मीनाक्षी भोयर प्रा. डॉ. प्रज्ञा निनावे इत्यादी शोध निबंध वाचकांनी आपले अभ्यासपूर्ण निबंध सदर विषयावर वाचले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी आपले विचार व्यक्त केले तर समारोप समारंभाचे अध्यक्ष मा. प्रभारी प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आधुनिक मराठी साहित्यातील बदलते सामाजिक जीवन मूल्य आणि जाणिवा या विषयावर आतापर्यंत दिलेल्या व्याख्यानांवर त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार आविष्कृत केले. या सत्रांमध्ये सूत्रसंचालक म्हणून मराठी विभागाचे प्राध्यापक आणि या चर्चासत्राचे समन्वयक प्रा.महेन्द्र सोनवणे यांनी काम पाहिले .या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील प्रा.डॉ रेखा पाटील आणि प्रा. महेंद्र सोनवणे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
यात प्रा. डॉ. पी आर गवळी, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस बी पाटील, प्रा.डॉ. आर. व्ही.भोळे प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा.डॉ. सतीश पाटील, प्रा. एस.बी महाजन, प्रा. डॉ. वैष्णव, प्रा. सुनील इंगळे, प्रा.डॉ. विनोद रामटेके प्रा. डॉ.जे पी नेहते, प्रा. डॉ. संदीप साळुंके प्रा. विलास पाटील, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, प्रा.नरेंद्र मुळे यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.रेखा पाटील यांनी केले. या राष्ट्र स्तरीय चर्चासत्रामध्ये विविध राज्यातील गुजरात ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश , तेलंगणा , गोवा आणि महाराष्ट्र इत्यादी ठिकाणांहून २४७ प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेशातील ग्रामीण कवी प्रकाश किनगावकर आणि प्रा.डॉ.संजीव गिरासे खानदेशी साहित्यिक यांनी देखील आपले अनमोल विचार मांडले.

