ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपूर तालुका रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाची महिला खेळाडू सिरनामे अंकिता यशवंत एस वाय बी.एस.सी. ची विद्यार्थिनी सॉफ्टबॉल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघात हिची निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
सदर स्पर्धा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चे सामने सोनीपत, हरियाणा येथे दिनबंधू छोटूराम, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विद्यापीठ, मुरथूल येथे दिनांक- 10 ते 14 मार्च 2022 रोजी होणार आहेत. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन एन. झोपे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांचे तिला मार्गदर्शन लाभले. [ads id="ads2"]
तसेच संस्थेचे चेअरमन श्री श्रीराम नारायण पाटील व अध्यक्ष श्री भागवत भाऊ विश्वनाथ पाटील तसेच सेक्रेटरी श्री संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयातील क्रीडा समितीचे सदस्य प्रा.डॉ.के.जी. कोल्हे प्रा.डॉ पी.आर. गवळी, प्रा. डॉ. आर व्ही.भोळे, प्रा.एस. आर. इंगळे प्रा. डॉ. रेखा पाटील व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी पुढील होणारे आंतरविद्यापीठ सामने साठी शुभेच्छा दिल्या.

