यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे (Jalgaon SP Pravin Munde), अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी SP Chandrakant Gawali), उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विवेक सोनवणे (DYSP Vivek Sonawane) व्यासपीठावर उपस्थित होते. सुरवातीला विशेष महानिरीक्षकांचे स्वागत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पद्माकर महाजन, कांता बोरा, वर्षा पाटील यांनी केले. यानंतर ग्राम सुरक्षा दलात सामील युवकांना टी.शर्ट देऊन सन्मानीत केले. यावेळी रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी प्रास्ताविक केले.
या मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी पालिकेचे गटनेते आसीफ मोहम्मद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, कांता बोरा, नगरसेविका शारदा चौधरी, गयास शेख, सुनीता डेरेकर, वर्षा महाजन उपस्थित होत्या.

