भुसावळ तळवेल येथील येथील गरीब शेतकरी लीलाधर पुंडलिक लढे यांचा बैल सोमवारी रात्री अवकाळी पावसात वीज पडून ठार झाला, तर त्यांचा मजूर बालंबाल बचावला.[ads id="ads1"]
सोमवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसास अचानक सुरुवात झाली. त्यावेळी लढे यांच्या खळ्यातील निंबाच्या झाडाला बांधलेल्या बैलजोडीतील एका बैलावर वीज पडली त्यात बैलाचा मृत्यू झाला.[ads id="ads2"]
याचवेळी शेजारी झोपलेला रमेश पावरा हा कामगार बालंबाल बचावला आहे. त्यांच्या बैलजोडीची अंदाजे किंमत ७५ हजारांपर्यंत आहे. आज रोजी त्यांचे ४० हजारांपर्यंत नुकसान झाले आहे.
मुक्या प्राण्याचे मृत शरीर बघून घरातील पती-पत्नी व इतर सदस्यांचा शोक अनावर झाला होता. यावेळी गावातील बरीच मंडळी गोळा होऊन त्यांचे सांत्वन करीत होते. बैलाचा पंचनामा दवाखान्यातील शिपाई पांडुरंग वायकोळे यांनी केला, अशी माहिती तळवेल येथील प्रकाश सुधीर पाटील यांनी दिली.

