रावेर ( प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील बनावट अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेवक श्री राहुल रमेश लोखंडे, श्रीमती छाया रमेश नेमाडे, श्री नितिन दत्तू महाजन, श्री रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी आणि श्री शामकुमार नाना पाटील यांनी आपल्या बनावट अपंग प्रमाणपत्रावर तालुका अंतर्गत बदलीतून सुटचा तसेच सोयीच्या ग्रा प चा कार्यभार [ads id="ads2"] गेल्या पाच सात वर्षांपासून सांभाळलेला असल्याने आणि अजूनही काही त्याच ग्रा प मध्ये तळ ठोकून असल्याने त्या ग्रा प च्या कामकाजातही त्यांनी बनावट कागदपत्रांचा समावेश केला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी संभाळलेल्या ग्रा प रेंभोटा, मांगी, कोचुर बु,सिंगत, पुनखेडा, पुरी गोलवाडे, गाहूखेडा,वाघोदा बु इत्यादी ग्रा प च्या ग्रामनिधी, पा पु निधी, १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती योजना व इतर सर्व योजनांच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गट विकास अधिकारी प स रावेर यांचेकडे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय बुवा व सचिव रजनीकांत बारी यांनी केली आहे.
अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेवक यांच्या ग्रा प कामकाजाची चौकशी करा : दिव्यांग संघटनेची मागणी
बुधवार, मार्च ०९, २०२२

