जळगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
जळगांव - ९ मार्च, २०२२ बुधवार रोजी जळगाव भारत स्काऊट आणि गाईडस् जळगाव जिल्हा कार्यालयात दिक्षा वचन विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads1"]
दीक्षाविधी समारंभाचे प्रास्ताविक स्काऊट शिबिर सहाय्यक प्रमुख गणेश पवार यांनी केले. दीक्षा विधी समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी स्थायी समिती सभापती ॲड.सुचिताताई हाडा, प्रमुख अतिथी म्हणुन म.न.पा.जळगाव च्या नगरसेविका दिपमाला काळे, होते. शिबीर प्रमुख बी.व्ही. पवार, शिबिर सहायक प्रमुख गणेश पवार, रविंद्र कोळी, स्काऊट जिल्हा संघटक संजय बेलोरकर उपस्थित होते.[ads id="ads2"]
शिबीर प्रमुख बी.व्ही. पवार साहेब व शिबीर सहाय्यक प्रमुख यांच्या शुभहस्ते स्काऊट प्रशिक्षण च्या ३१ प्रशिक्षणार्थींना दिक्षा वचन विधी देण्यात आला. सर्व प्रशिक्षणार्थींना स्कार्प, वागल, कॅप, स्काऊट बॅच लावण्यात आले. भारत स्काऊट च्या झेंड्यावर हात ठेवून वचन विधीची शपथ घेण्यात आली. आजपासून हे सर्व प्रशिक्षणानार्थीं लाॅर्ड बेडेन पाॅवेल यांच्या जागतिक संघटनेचे अधिकृतपणे सभासद झाले.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थीमधून प्रमोद पाटील व उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व या सात दिवस चालू असलेल्या प्रशिक्षणासंदर्भात आपले अनुभव, मार्गदर्शकांनी दिलेलं ज्ञानदान हे आम्हाला उर्जा देणारे आहे. ही प्रेरणा घेऊन आम्ही सतत कार्य करणार असे प्रतिपादन केले.
शिबीर प्रमुख बी.व्ही.पवार यांनी प्रशिक्षणार्थींना अनमोल असे मार्गदर्शन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुचीताताई हाडा यांनी सर्व स्काऊट मास्टर गुरुवर्य यांना नमन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
दीक्षा वचन विधी समारंभाचे सूत्रसंचलन महेंद्र कोळी तर आभार जिल्हा संघटक संजय बेलोरकर यांनी मानले. समारंभ यशस्वीतेसाठी भारत स्काऊट आणि गाईड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

