जळगाव जिल्हा प्रतिनिधी (प्रमोद कोंडे) रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बस स्टॅन्ड एरिया ढाके वाड्यात महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे यांनी आपल्या माते समवेत ज्येष्ठ महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.[ads id="ads1"]
जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या योगदानाची, तपश्चर्याची, आणी त्यागाची आठवण हा दिवस करुन देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा ही देतो.स्त्री म्हणजे वासल्य,स्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व,[ads id="ads2"]
आपल्या मनोगतात त्यांनी महिलांचे अधिकार महत्व काय आहे हे पटवून सांगितले यावेळी ज्येष्ठ महिला शांताबाई पाटील, सुभद्रा कोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिंधुबाई शेलोडे, करुणा ढाके, इंदुबाई ढाके, वत्सलाबाई दोडके, कमल मनुचारी, सरला चौधरी, चारुलता नेहते, शारदा चौधरी,सविता पाटील, आरती आखरे, ममता भंगाळे, हर्षा कोळंबे, यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमाचे आभार चारुलता नेहते यांनी मानले.

