निंभोरा पोलिस (Nimbhora Police)ठाण्याचे हवलदार विलास झांबरे हे 9 रोजी पोलिस वाहनाद्वारे गस्त घालत असताना बलवाडी-तांदलवाडी रस्त्यावरील सिंगत (Singat) गावापुढे रात्री 12.30 वाजेनंतर टाटा कंपनीची मालवाहू गाडी (एम.एच.19 सी.वाय.7714) ही संशयास्पदरीत्या उभी असल्याने चालकाची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर निंभोरा पोलिसांना (Nimbhora Police) माहिती कळवण्यात आली. सहाय्यक निरीक्षक गणेश धूमाळ (API Ganesh Dhumal) व पोलिस नाईक ईश्वर चव्हाण (Police Naik Ishwar Chavhan) यांनी धाव घेवून वाहनाची तपासणी केली असता त्यात 60 हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनिअम तारांचे बंडल आढळले.
चार लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त
चालक जितेंद्र शांताराम पवार याला बोलते केल्यानंतर त्याने साथीदारांची नावे सांगत चोरीच्या उद्देशाने या भागात आल्याची कबुली दिली. संशयीताकडून टेम्पोसह चार लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ (API Ganesh Dhumal) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.

