चोपडा (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेनुसार प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका व शहर कार्यकारणीच्या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी अॅड. रविकांत वाघ व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.[ads id="ads2"]
तरि चोपडा तालुक्यातील बहुजन विचार धारेच्या प्रवाहात पदभार घेऊन सक्रीय सहभाग घेणाऱ्या सर्व तमाम आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्ह्याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते कि दिनांक 11/03/2022 शुक्रवार रोजी ठीक १२:०० वाजता शासकीय विश्रामगृह चोपडा येथे तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

