रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे
कमलाकर माळी यांचा माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील सतत सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले कमलाकर माळी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन नवीन उपक्रम राबवत असतात पण या वर्षी त्यांनी ग्रामस्थांना एक अनोखी भेट दिली आहे.स्वखर्चाने त्यांनी बसस्थानक परीसरात वडाच्या झाडाखाली बैठकी ओट्यावर वाघोदेकर सार्वजनिक वाचन कट्टयाची सोय ग्रामस्थांना करुन दिली आहे.[ads id="ads1"]
ग्रामस्थांना व गावातील तरुण मुलांना वाचनाची सवय लागावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने हा समाजपोयोगी उपक्रम राबवला आहे. आतापर्यंत त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मोफत मोतीबिंदू शिबीर व्याख्यान रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबवले आहेत आणी यावर्षी माणुसकी समुहाच्या माध्यमातुन सार्वजानिक वाचन कट्ट्याची सोय करुन दिली आहे.[ads id="ads2"]
त्यात काही वाचनीय पुस्तके तसेच दररोज वर्षभर वृत्तपत्र टाकण्याचे काम कमलाकर माळी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे गावात भरपूर ग्रामस्थांना वाचनाची सवय आहे पण काही ना काही अभावी प्रत्येक जण पेपर खरेदी करु शकत नाही व सर्व समाज एका ठिकाणी येईल यासाठी हा प्रयत्न कमलाकर माळी यांनी केला आहे अशा या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.


.jpg)