रावेर (Raver) तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd) येथील रहिवासी लक्ष्मण सीताराम चौधरी (वय ४२) यांनी ३ रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत विवरे गावात (Vivare Village) एकच खळबळ उडाली आहे. [ads id="ads2"]
लक्ष्मण चौधरी हे पेंटिंगचे (Penting) काम करायचे. घरात आई आणि लक्ष्मण हे दोघेच राहत होते. लक्ष्मणच्या निधनाने त्याच्या आईचा आधारच हरपला. या घटनेबाबत निंभोरा पोलिसांत (Nimbhora Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही.


