खोटे दस्त व दप्तरी हेराफेरी भोवली ; मुक्ताईनगर बिडिओ सह ६ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

खोटे दस्त व दप्तरी हेराफेरी भोवली; मुक्ताईनगर बिडिओ सह ६ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल

मुक्ताईनगर(समाधान गाढे) मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे कोर्हाळा गावी ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची फसवणूक केली. म्हणून मुक्ताईनगर पंचायत समिती चे विद्यमान गट विकास अधिकारी संतोष रघुनाथ नागतीलक आणि अन्य सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर चे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजते.[ads id="ads2"] 

  सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार १)टीसीएल पावडर खरेदी,२)क्लोरीन डोस मशीन बसवणे आणि ३)जिल्हा परिषदेच्या शाळेस संरक्षक भिंत बांधणे अशा कामांत भरती वरती १ लाख ७४ हजार ९६३ रुपये, ३८ हजार ५०० रुपये आणि २ लाख रुपये असे मिळून ४ लाख १३ हजार ४०६ रुपयांचा सरकारी मालमत्तेचा स्वतः व सामुहिक लाभा साठी अपहार केला म्हणून हा खटला आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- भुसावळ हत्याकांडातील पाचव्या आरोपीला नाशिकमधून बेड्या

सदर खटल्या मध्ये आरोपी क्र. १) संतोष रघुनाथ नागटिळक २) योगेश शिवाजी पवार ३) एस एस सुरवाडे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मुक्ताईनगर ४)दिगंबर रामप्रसाद लोखंडे जिल्हा परिषद जळगाव ५)प्रवीण प्रल्हाद कांडेलकर कोर्हाळा तालुका मुक्ताईनगर आणि बी.सी./बळीराम चान्गो महाजन रा. कुर्हा काकोडा तालुका मुक्ताईनगर अशा सहा जणांच्या विरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज क्रमांक ४०/२०२२ नुसार फिर्यादी संतोष त्रंबक कोळी यांचे तक्रारीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर तक्रारीचे कारवाई चे मागणी साठी फिर्यादी हा जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसला असतांना आरोपी यांनी चुकीचे दस्त व अहवाल देवून तक्रारदाराची प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या साक्षी ने फसवणूक करण्यात आले आहे असेही तक्रारदाराचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.सदर फिर्यादीतर्फे वकिल संतोष इंगळे हे कोर्टात काम पहात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!