डांभुर्णी वि.का.सोसायटी चेअरमनपदी डॉ.विवेक चौधरी, तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब सोनवणे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल दि. 25(सुरेश पाटील) तालुक्यातील डांभुर्णी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची सभा दि.23 मार्च रोजी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी.भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.[ads id="ads1"] 

  या सभेत संस्थेच्या चेअरमनपदी डांभुर्णी येथील प्रगतशील शेतकरी तथा जळगाव येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.विवेक दिवाकर चौधरी तर व्हा.चेअरमन पदी बाळकृष्ण पंडीत सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे 13संचालक निवडून आले शेतकरी पॅनेलचे नेतृत्व डॉ.विवेक चौधरी व सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी यांनी केले संचालक प्रवीण महाजन,उमाकांत भादले,जितेंद्र भंगाळे,ललित चौधरी,सुहास सरोदे,भिमराव फालक,राजू कोळी,गोकुळ कोळी सौ.कांचन फालक,सौ.सुजाता फालक,टेनीराम सरोदे सभेत उपस्थित होते.[ads id="ads2"] 

  डांभुर्णी वि.का.सो.ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी व शेतकरी सभासदांना नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील व सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबंध असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन डॉ.विवेक चौधरी यांनी सांगितले सचिव संजय महाजन,तोताराम भारंबे यांनी सभेचे कामकाज पाहीले.

हेही वाचा :- लग्न जुळत नसल्यामुळे नशिराबाद च्या 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

 यावेळी यावल पंचायत समितीचे माजी सभापती सौ.पल्लवी पुरूजीत चौधरी अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी,हेमराज फालक, अनिल भीमराव साठे,भरत सोनवणे,ललित फालक,जगन्नाथ चौधरी,अरुण चौधरी,माजी चेअरमन अंकुश फालक,सुभाष फालक इ.सह संस्थेचे सभासद व डांभुर्णी ग्रामस्थ यांनी चेअरमन डॉ.विवेक चौधरी व व्हा.चेअरमन बाळकृष्ण सोनवणे व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!