यावल (सुरेश पाटील) किनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली असून 24 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.[ads id="ads1"]
दिनांक 25 मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 28 मार्च छाननी,12 एप्रिल माघार,आणि 24 एप्रिल रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.8जनरल,2 महिला राखीव , 1अनुसूचित जाती जमाती,1 भटक्या विमुक्त जाती,1ओबीसी अशा एकूण तेरा जागेसाठी मतदान पार पडणार आहे.[ads id="ads2"]
634 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणूक बिनविरोध होते की निवडणूक संपन्न होते यासाठी 24 एप्रिल पर्यंत मतदारांना वाट पहावी लागणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी.भारंबे हे काम करीत आहेत.
हेही वाचा :- लग्न जुळत नसल्यामुळे नशिराबाद च्या 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या



