रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर (Raver) येथील अल्पवयीन मुलीची बदनामी न करण्यासाठी खंडणी मागणार्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.[ads id="ads2"]
रावेर (Raver) येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या घटनेनंतर मुलीची बदनामी न करण्यासाठी तिच्या वडिलांकडे १५ लाख (15 Lakh) रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणयावरून जयेश मोतीलाल सपकाळे, गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :- लग्न जुळत नसल्यामुळे नशिराबाद च्या 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या
या तिघा आरोपींना पोलिसांनी (Police) तात्काळ अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीमुळे आरोपींंची जळगाव (Jalgaon) येथील जिल्हा कारागृहात (District Jail) रवानगी करण्यात आली आहे.



