जळगाव शहराकडून मोहाडीकडे (Mohadi) जाणाऱ्या रस्त्यावर लांडोर खोरी उद्यानाच्यापुढे उत्तर उतरतीवर एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुखःद घटना घडली. दरम्यान घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली असून घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहचले आहे.[ads id="ads1"]
मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेलेला होता. शाळेतून त्याला दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.१११ ने राजू गवळी हा घेऊन येत होता. लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरती मार्गावर समोरून ट्रक क्रमांक एमएच.२८.बी.७७०३ हा आरटीओ ट्रॅकहून परतत होता.[ads id="ads2"]
उतरतीवर ट्रकच्या चाकाखाली आल्याने सुजय सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने लागलीच घटनास्थळावून पळ काढला. सुजय मोहाडी येथील रहिवासी असल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, मृत सुजयच्या नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital Jalgaon) एकच आक्रोश केला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत.



