ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे मुक्ताईनगर विधानसभा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या जनतेप्रती सकारात्मक मानसिकतेचा ऐनपुर वासीयांना आला अनुभव आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या स्वखर्चाने बायपास रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आमदार निधीतून ऐनपुर बस स्टॉप ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामाला चार ते पाच दिवस झाले सुरुवात करण्यात आली असून ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन यांनी कर्तव्य दक्ष आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे जवळ बायपास रस्त्याची मांगणी केली गेल्या २०ते२२वर्षापासून ऐनपुर बायपास रस्त्याची मांगणी होत होती.[ads id="ads2"]
पण प्रश्न काही सुटत नव्हता हीच मागणी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कडे करण्यात आली असता रेंभोटा येथील आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निकटवर्तीय छोटुभाऊ पाटील यांना रस्त्याची पाहणी करून गावकरी यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा आदेश दिला लगेच छोटुभाऊ पाटील यांनी ऐनपुर ग्रामपंचायत चे सरपंच,सदस्य,व शेतकरी यांच्या सोबत चर्चा करून रस्त्याची कैफियत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कडे मांडली लागलीच आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या स्वखर्चातून या रस्त्याचे दिनांक २३/०३/२०२२रोजी सकाळी १०वाजता छोटुभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत ऐनपुर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शामू पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व मा.पं.स.सदस्य रविंद्र महाजन यांच्या हस्ते कुदळ मारून कामाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी ऐनपुर चे सरपंच अमोल महाजन, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील,अनिल जैतकर, सतिश अवसरमल, नजिर शेख ,रघुनाथ पाटील, भगवान महाजन, शिवसेना युवासेना उपतालुकाप्रमुख तुषार कचरे,ता.सचिव निलेश महाजन,सुधाकर पाटील, गोपाल पाटील, सुनिल महाजन,बाळु पाटील, विनोद पाटील, राहुल महाजन, मोहन कचरे,राजू चव्हाण,वासु पाटील, सुनील चव्हाण, सुनिल खैरे, अनिकेत महाजन ,विनोद कपले,वैभव चौधरी, मनिष महाजन, प्रल्हाद बारी, नारायण बारी,प्रियश कोळी, दिनेश चव्हाण उपस्थित होते.



