एकनाथ परमेश्वर माळी हे मुलासह शेतात गुरांना चारा घेण्यासाठी गेले होते. दरम्यान बैलगाडीत चारा भरत असताना बैलांनी अचानक धाव घेतली. त्यात गाडीवर उभे असलेले एकनाथ माळी धाडकन खाली कोसळले. त्यांच्या पोटावर बैलाचा पाय पडला व त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत परिजणांनी चाळीसगाव येथील सर्वज्ञ हॉस्पिटल येथे दाखल केले. [ads id="ads2"]
डॉ. हर्षल सोनवणे यांनी सोनोग्राफी, सिटीस्कॅन व एक्स-रे काढून पुढील उपचाराला दिशा दिली. त्यांच्या किडनीला मोठी जखम झाल्याने त्वरीत ऑपरेशन करण्याचा डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना सल्ला दिला.
हेही वाचा :- जळगावात शाळकरी मुलाला ट्रकने चिरडले ; संतप्त जमावांकडून ट्रकवर दगडफेक
पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील हेडगेवार हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले. मात्र तेथे आयसीयु शिल्लक नसल्यामुळे घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर 21 रोजी पोहरे येथे अंतिम संस्कार करण्यात आले.



