वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे- प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने
सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे ग्रंथप्रदर्शन संपन्न झाले दिनांक २२-०३-२०२२ ते २३-०३-२०२२ या दोन दिवशी सदर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथालयातर्फे करण्यात आलेले होते.[ads id="ads1"]
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. रवींद्र पाटील हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी उद्घाटनपर मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना संबोधन करताना वाचन हे प्रत्येकाच्या बौद्धिक कक्षा उंचावण्याचे एक अनिवार्य साधन असून प्रत्येकाने वाचन हे केलेच पाहिजे.इंटरनेट आणि सोशल मीडिया च्या युगात आजची पिढी वाचन विसरत चालली आहे.[ads id="ads2"]
पण चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. त्याशिवाय ज्ञानाची भूक शमणार नाही. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजीनियर श्री. रवींद्र पाटील यांनी आपल्या भाषणात वाचनामुळे दैनंदिन तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाचन हे आपल्याला सकारात्मक आधार देतात असे उल्लेखित केले. ग्रंथपाल डॉ. संदीप एस. साळुंके यांनी ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध असलेल्या वैविध्यपूर्ण वाचन साहित्याची माहिती वाचकांना करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय सल्लागार समितीच्या मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :- जळगावात शाळकरी मुलाला ट्रकने चिरडले ; संतप्त जमावांकडून ट्रकवर दगडफेक
हेही वाचा :- पोटावर बैलाचा पाय पडल्याने उपचारादरम्यान शेतकरी ठार ; जळगाव जिल्ह्यातील घटना
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, सिनेट सदस्य डॉ. के. जी. कोल्हे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. व्ही. एन. रामटेके, डॉ. एस. एन. झोपे, डॉ. रेखा पाटील, डॉ. पी. आर. महाजन, डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. नरेंद्र मुळे, मुख्य लिपिक श्री. गोपाल पाटील, श्री. श्रीराम चौधरी, श्री. गोपाल पाटील, श्री. महेंद्र महाजन, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या दोन दिवशीय ग्रंथ प्रदर्शनास एकूण २०४ वाचकांनी उपस्थिती नोंदविली.



.jpg)