स्वतःचा अंतर्बाह्य विकास म्हणजे व्यक्तीमत्व विकास होय-प्राचार्य डॉ जे बी अंजने
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय प्रा. पी.पी. लढे जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर यांनी मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.[ads id="ads1"]
अगदी कौटुंबिक जीवनापासून ते विद्यार्थिनी जीवनापर्यंत सर्व गोष्टींचा विकास कसा कसा होतो हे त्यांच्या मनोगतात सांगितले. तसेच या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते माननीय प्रा. डॉ. संजीव साळवे जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संघांमध्ये महिलांना प्रवेश दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये महिलांना संधी दिली गेली होती. [ads id="ads2"]
त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनीसुद्धा महिलांसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, मुलींसाठी शाळा काढली, मुलींना शिकवलं आणि पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना समान संधी समान हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना समान अधिकार व समानता स्वातंत्र्य मिळवून दिले असे त्यांच्या मनोगतात सांगितले. या कार्यशाळेचे तिसऱ्या प्रमुख वक्त्या प्रा. मोहिनी तायडे, भालोद महाविद्यालय, भालोद यांनी "बेटी बचाव बेटी पढाव" या विषयावर मुलींच्या गर्भधारणेपासून ते जन्माला येईपर्यंत च्या या काळामध्ये स्त्रीच्या गर्भाची कशी तपासणी केली जाते आणि जर मुलगी असेल तर तिचा गर्भपात केला जातो. म्हणून तसे होऊ नये यासाठी महिलांनी प्रयत्न केला पाहिजे मुलींना शिकवले पाहिजे असे त्यांच्या मनोगतात सांगितले. या कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी विद्यार्थिनींनी करिअर करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे त्यांच्या मनोगतात सांगितले.
स्वतःचा अंतर्बाह्य विकास म्हणजे व्यक्तीमत्व विकास होय.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नीता वाणी यांनी केले तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी केले. या कार्यशाळेमध्ये रावेर,भालोद, फैजपूर, जळगाव, मुक्ताईनगर येथील महाविद्यालयातील 109 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेसाठी आलेल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. आर व्ही भोळे प्रा. डॉ. विनोद रामटेके प्रा. डॉ. के.जी. कोल्हे प्रा. डॉ. संदीप साळुंके प्रा. डॉ. निता वाणी प्रा. डॉ. रेखा पाटील प्रा. प्रदीप तायडे, अक्षय महाजन,प्रा. मुळे प्रा. एम. के. सोनवणे प्रा डॉ. पी. आर. गवळी यांनी परिश्रम घेतले. शेवटी उद्घाटन समारंभाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. कुमावत यांनी मानले व या कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी मानले



