भुसावळ तालुक्यातील कपिल वस्ती येथे वंचित बहुजन आघाडीचा ३ वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिन कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा प्रभारी आद.ॲड.रविकांतजी वाघ साहेब यांच्या मार्गदशनाखाली व वंचित बहुजन आघाडी जळगाव पुर्व जिल्हाध्यक्ष आद.विनोदजी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. [ads id="ads1"]
या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव दिनेशभाऊ इखारे, वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे, कामगार नेते बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिकभाई बेग, जिल्हा संघटक राजेद्र बारी जिल्हा महिला आघाडी महासचिव वंदनाताई आराक, जिल्हा महिला आघाडी संघटक शोभाताई सोनवणे,जिल्हा उपाध्यक्षा मिराताई वानखेडे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे,भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे, ग्राम पंचायत सदस्य विजय मालविय, कुणाल सुरडकर यांनी मनोगत व्यक्त केले .यांनी पक्षाचे ध्येय धोरणे, व पक्ष वाढिव कशाप्रकारे करावे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .[ads id="ads2"]
यावेळी बहुजन आघाडी तर्फ ई श्रम कार्ड मोफत वाटप करण्यात आले.तसेच गौतम लोखंडे व अस्लम भंगरवाले यांनी कार्यकर्त्यांन सोबत पक्ष प्रवेश केला .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, रुपेश कुऱ्हाडे,यावल तालुका महासचिव राजेश गवळी, रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष कोळी,वंचित बहुजन आघाडी च्या सरपंच रोहिणी ताई कोलते,ग्राम पंचायत सदस्या पुनम सुरडकर, प्रमिलाताई बोदडे, दिलीप पानपाटिल, शरद बोदडे, राहुल गवई,विजय सोनवणे,फैजपुर शहराध्यक्ष सोनु वाघुळदे यांनी परिश्रम घेतले व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी सूत्रसंचालन राहुल गवई यांनी केले व आभार प्रदर्शन वंदनाताई आराक जिल्हा महासचिव यांनी केले.



