ऐनपूर ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सिद्धा अभियानांतर्गत विज्ञार्थिनींनीसाठी १४ मार्च २०२२ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत ज्युडो कराटे, ताक्वंदो प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. [ads id="ads1"]
त्याचे उदघाटन नुकतेच उपप्राचार्य डॉ एस बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. विद्यार्थिनींनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा ज्युडो कराटेचे कौशल्य आत्मसात करुन स्वसंरक्षण करावे असे आवाहन प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. [ads id="ads2"]
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके आणि डॉ. नीता वाणी, डॉ. एस. बी. पाटील, यांनी विद्यार्थिनींना ज्युडो कराटे शिबिराचा उद्देश व महत्व सांगितले. विद्यार्थीनींनी शिबिराचा लाभ घेऊन स्वसंरक्षण करावे असे सांगितले.शिबीराचे प्रशिक्षक राजेंद्र सुरवाडे, गणेश जलंकार यांनी आठ दिवसात विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधीकारी डॉ. विनोद रामटेके यांनी केले सूत्रसंचालन डॉ. नीता वाणी यांनी तर आभार प्रा पुजा कुमावत यांनी मानले . शिबीरात ६५ विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या आहेत.