यावल दि.5(सुरेश पाटील) तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 2021-22 समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्फराज जुम्मा तडवी हे होते.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्यध्यापक इतबार रमजान तडवी यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी सौ.सुवर्णा प्रवीण पवार,सौ.तायरा फरीद तडवी,सौ.आरती समाधान सावळे,शकील जुम्मा तडवी, अजित इतबार तडवी हे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाले म्हणून विद्यार्थ्यां मधे आनंद व्यक्त करण्यात आला. त्यांच्या एक मध्ये नवचैतन्य निर्माण झाले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक इतबार तडवी यांनी केले.


