घरकुल बांधकामासाठी वाळू वाहतुकीसाठी परवानगी मिळणार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर सावदा शहरासह तालुक्यात मिळत नसल्याने बांधकामे बंद पडलेली आहे. रॉयल्टी देण्याची तरतूद आहे. असे असतांना घरकुल लाभार्थिना बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध होत नव्हती. [ads id="ads1"] 

 रावेर तहसील बांधकामासाठी रावेर तहसील (Raver Tahsil)  कार्यालयाकडून शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांना बाळू घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास वाळू विना रावेर कार्यालयामार्फत (Raver Tahsil) घरकुल बांधकामासाठी वाळू वाहतुकीला परवानगी दिली जात नसल्याचा ओरड होत होती. मात्र आता घरकुल मागणी केल्यास प्रत्येक घरकुलासाठी पाच ब्रास वाळूची परवानगी मिळणार असल्याचे तहसीलदार (Raver Tahsil) यांनी पत्रकारांशी ला सांगितले.[ads id="ads2"] 

रावेर शहरातील (Raver City)  घरकुल लाभार्थीनी तहसीलदार यांचे कडे घरकुल बांधकाम संदर्भात वाळू मिळत नसल्याची कैफियत मांडली होती. घरकुल लाभार्थिनी नगरपालिकेच्या सीईओंची भेट घेऊन रावेर तहसील कार्यालयातील (Raver Tahsil Office) झालेला वाळू संदर्भातील संवाद सीईओ यांना सांगितला. नगरपालिकेकडून घरकुल लाभार्थीसाठी वाळू नगरपालिकेने मागणी केली नसल्याचे लाभार्थींनी सी ईओं ना सांगितले. त्यावेळेस सीईओंनी तहसील कार्यालयाला आजच पत्र देऊन घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध करून देण्यासंदर्भात यादी उपलब्ध करून देत आहोत असे सांगितले.

तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले आमच्याकडे रावेर, सावदा नगरपालीका मुख्याधिकारी, आणी ग्रामीण भागासाठी घरकुल बांधकामासाठी लाभार्थिंना वाळू वाहतुकीच्या संदर्भात या कार्यालयाकडे यादी दिली नाही व मागणीसुद्धा केली नसल्याने आम्ही परवानगी देवू शकत नाही. बी. डी. ओ. आणी नगरपालीका सिईओ यांचे कडून मागणी पत्र आल्यावर प्रत्येक घरकुलाच्या लाभार्थिना ५ ब्रास वाळू उपलब्ध करून दिली.

   जाणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी स्पष्ट केले. गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी सांगितले तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतींना पत्र पाठवलेले आहेत घरकुल लाभार्थ्यांना वाळू हवी असल्यास गट विकास अधिकारी कार्यालयाला कळवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु ग्रामपंचायत कडून कोणाकडूनही मागणी आलेली नाही. फक्त एका गावाची मागणी आली होती ती आम्ही तहसील कार्यालयाकडे पाठवलेली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!