ऐनपुर/निंबोल प्रतिनिधी (विनोद कोळी) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हायुवा अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्ताने रावेर (Raver) तालुक्यातील निंबोल येथील जिल्हा परिषद (Zilha Parishad School Nimbol) शाळेत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.[ads id="ads1"]
वाढदिवसा निमीत्ताने पोस्टर्स आणि केक साठी 20 ते 30 हजार रुपये खर्च होतात, पण तेच पैसे खर्च न करता तो पैसा अविनाश भाऊनी शिक्षणासाठी लागणारे साहित्य म्हणून वही पेन वाटप चा कार्यक्रम जि.प.मराठी शाळेत घेतला. अविनाश पाटील यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की माझ्या साठी वाढदिवस महत्वाचा नसुन तोच पैसा चांगल्या कार्याला लागला पाहिजे. [ads id="ads2"]
अविनाश पाटील यांनी आपले विचार मांडले. त्या ठिकाणी उपस्थीत, शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख, सुरेश चिंधू पटिल. उपजिल्हा प्रमुख, योगेश पटिल. उपतालुका प्रमुख, राजु भाऊ पाटील. उप तालुका प्रमुख, भगवान कोळी. तालुका सचिव, मछिन्द्र कोळी. तालुका प्रसिद्धीप्रमुख विनोद कोळी. शे, वशिम भाऊ. तसेच शाळेतील शिक्षक, गावातील कार्यकर्ते, आणि शाळेतील विद्यार्थी खुप मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



