भुसावळातील लॉजमधील देहव्यापार प्रकरणी सातही आरोपींना एका दिवसांची पोलिस कोठडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा मारत पाच वेश्यांसह (वारांगणा) जिल्ह्यातील चार आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"]  

हॉटेल मालक, मॅनेजरसह सात ग्राहकांना अटक

पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांची सुटका करीत त्यांना ताब्यात घेतले आहे तर बेकायदेशीरपणे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी आनंद लॉजचे मालक हरीष नागदेव फालक (62, गायत्री मंदिराजवळ, भुसावळ), हॉटेल मॅनेजर राजेंद्र मुरलिधर नेमाडे (65, नंदनवन कॉलनी, भुसावळ), हेल्पर दीपेन रवींद्र सुरवाडे (40, वानखेडे कॉलनी, भुसावळ) यांच्यासह आंबटशौकीन ग्राहक शुभम दिनकर बरकले (24, कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ), अकबर शहा कादर शहा (32, दिनदयाल नगर, भुसावळ), शेख सत्तार शेख जब्बार (41, विवरा खुर्द, ता.रावेर), मोहसीन गंभीर पिंजारी (45, शिरसोली प्र.बो., ता.जळगाव) यांच्या विरोधात पोलिस हवालदार रमण सुरळकर यांच्या विरोधात पीटा अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी, नाईक उमाकांत पाटील, नाईक अश्विनी जोगी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल सचिन चौधरी आदींच्या पथकाने केली.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!