अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार ; मुक्ताईनगर येथील खडसे पंपासमोरिल घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मुक्ताईनगर येथील खडसे पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एक जणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
[ads id="ads1"] 

  याबाबत सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री आकराऊत येथे जत्रा भरलेली असून या यात्रेत जवळपासच्या सर्व गावातून यात्रेकरूंची गर्दी होत असते. [ads id="ads2"] 

  अशाच प्रकारे यात्रा पाहण्याच्या ओढीने मुक्ताईनगर नगर पंचायतीत कर्मचारी असलेले रत्नदिप कोचुरे व संजय सोनार हे यात्रा पाहून दि 22 मार्च च्या मध्यरात्री 1 ते 1: 30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडे परतत असतांना खडसे यांच्या पंपासमोर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस धकड दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रत्नदीप कोचुरे हे जागीच ठार झाले तर संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु होती.

हेही वाचा :- फैजपूर येथील १८ वर्षीय तरूण घरातुन बेपत्ता, कुटुंबाकडून शोध सुरू 

हेही वाचा :- भुसावळातील आनंद लॉजवर छापा ; पाच महिलांसह ग्राहक ताब्यात 

हेही वाचा :- यावल तालुक्यातील 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

दरम्यान , मुक्ताईनगर नगरपंचायत मधील एक हसत मुख , व मनमिळावू असलेला कर्मचारी रत्नदीप कोचुरे यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आहे व ते जळगाव येथील स्थायिक रहिवासी आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!