मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने संपविली जीवन यात्रा ; पती व सासऱ्यांना अटक ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


बोदवड शहरातील (Bodwad City) गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना नीलेश महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

बोदवडच्या गोरक्षनाथनगरमध्ये (Gorakshanath Nagar, Bodwad) राहणाऱ्या भावना महाजन व निलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्याने पती व चुलत सासरे व सासू विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला क्रूर वागणूक दिली होती. जाचाला कंटाळून भावना महाजन यांनी सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.[ads id="ads2"] 

मूलबाळ होत नसल्याने जाच करीत सासरच्या मंडळींनी आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून भूषण अशोक माळी (रा. असोदा) यांनी पोलिसात (Police Station)  फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा. गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- फैजपूर येथील १८ वर्षीय तरूण घरातुन बेपत्ता, कुटुंबाकडून शोध सुरू 

हेही वाचा :- भुसावळातील आनंद लॉजवर छापा ; पाच महिलांसह ग्राहक ताब्यात 

हेही वाचा :- यावल तालुक्यातील 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता


   शवविच्छेदनासाठी महिला डॉक्टर नसल्याने मृत विवाहितेवर जळगावी (Jalgaon) शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह असोदा (Asoda)  येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्य आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी (API Sharad Mali) तपास करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!