फैजपूर येथील १८ वर्षीय तरूण घरातुन बेपत्ता, कुटुंबाकडून शोध सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

फैजपूर येथील १८ वर्षीय तरूण घरातुन बेपत्ता, कुटुंबाकडून शोध सुरू

फैजपूर प्रतिनिधी (किरण तायडे)  : शहरातील कासार गल्लीतील राहणारा तरूण मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे. नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू असुन. अद्याप याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाहीये.[ads id="ads1"] 

आदित्य तुळशीराम काठोके (वय-१८) हा तरूण फैजपूर शहरातील कासार गल्लीत राहतो कुटुंबात आई, वडील आणि बाहिणी असा परिवार आहे. आदित्य सध्या जळगाव येथील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत आहे तर वडील तुळशीराम काठोके हे प्लॉट खरेदी व विक्री करण्याचे काम करतात.[ads id="ads2"] 

   दरम्यान, सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अदित्य काठोके ह कुणाला काहीही न सांगता त्याचा मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून कपड्यांची बॅग घेवून बेपत्ता झाला आहे. चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले की, मला घरात सन्मान मिळत नाही, म्हणून मी घर सोडून जात आहे, माल कुणी विचारत नाही. असा मजकूर लिहिलेला आढळला. आईवडील व बहिण यांनी आदित्य याचा शोध सुरू केला आहे अद्याप फैजपूर पोलीसात कुठलीही नोंद अथवा तक्रार करण्यात आलेली नाही. कुणाला सदरील तरूण आढळून आल्यास 9423914789, 9595766378 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!