ऐनपूर : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचा खेळाडू राजू ईश्वर कचरे टी. वाय. बी. एस्सी. चा विद्यार्थी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव साॅफ्टबाॅल संघात निवड करण्यात आली आहे. सदर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सामने आचार्य नागार्जुन विद्यापीठ येथे २४ मार्च - ३० मार्च २०२२ होणार आहेत. [ads id="ads2"]
सदर सॉफ्टबॉल विद्यापीठाचा संघ दिनांक २२ रोजी नवजीवन एक्सप्रेस ने रवाना झाला. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्री. सचिन झोपे व प्राचार्य डॉ. श्री. जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, अध्यक्ष श्री. भागवत भाऊ विश्वनाथ पाटील, तसेच सेक्रेटरी श्री. संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. के जी कोल्हे, प्रा. डॉ. पी आर गवळी, डॉ. प्रा. एस. आर. इंगळे, प्रा. डॉ. रेखा पाटील , उपप्राचार्य डॉ. एस. बी पाटील , डॉ आर व्ही भोळे यांनी त्यास शुभेच्छा दिल्या.



